Saturday 3 October 2020

किशोर मासिक

किशोर मासिक बालकांचे आवडीचे मासिक अवश्य पहा download या बटण वर क्लिक करा

Thursday 10 September 2020

आपणास माहीत आहे का?

🌺आधुनिक आश्चर्य🌺 🏵️गोल्डन गेट ब्रिज🏵️ कॅलिफोर्नियामधील सॅनफ्रान्सिस्को येथील सॅनफ्रान्सिस्को आणि युनायटेड स्टेट हायवे जोडणारा 'गोल्डन गेट ब्रिज' हा आधुनिक जगातील आश्चर्य मानला जातो. हा पूल यूनाइटेड स्टेट महामार्ग क्रमांक १०१ आणि कॅलिफोर्निया राज्य महामार्ग क्रमांक १ याां दोहोंचा भाग असून, उत्तरेकडून सॅनफ्रान्सिस्कोतून बाहेर पडणारा तो एकमेव मार्ग आहे. 'गोल्डन गेट ब्रिज' १.७ मैल(२७३७ मीटर) व रुंदी ९० फुट म्हणजे (२७.४३ मीटर) आहे. पाण्याच्या पातळीपासून पुलावरील रस्ता २२० फूट उंचीवर असून, पुलाखालील कमानीमधील सर्वाधिक लांब अंतर ४२०० फुट आहे. गाड्या,पादचारी व सायकली या सर्वांसाठी वेगळा मार्गाची रचना या पुलावर आढळते. या फुलावर सहापदरी रस्ता असून त्याच्या दुतर्फा पादचारी मार्ग आहे. या पुलावरील वाहतूक २७ मे १९३७ रोजी प्रारंभ झाला . या पुलावरून दररोज सरासरी एक लाख गाड्या धावतात. या पुलावरील वेगमर्यादा ताशी ७० किलोमीटर एवढी नियंत्रित ठेवली आहे. न्यूयार्क शहरातील व्हेरॅझनो नॅरो हा पूल होण्याआधी 'गोल्डन गेट ब्रिज' जगातील सर्वात मोठा सस्पेंशन पूल होता.आता तो दुसऱ्या क्रमांकावर आहे . या पुलाची रचना जोसेफ स्ट्रान्स या अभियंत्याने केली असून त्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरी बद्दल १९५५ मध्ये त्याचा पुतळा या पुलावर बसवला गेला या पुलाला दिलेल्या नारंगी रंगामुळे 'गोल्डन गेट ब्रिज'धुक्यातूनही उठून दिसतो. आजही जागतिक स्तरावर सॅनफ्रँन्सिस्को चे प्रतीक म्हणून गोल्डन गेट ब्रिज ओळखला जातो.

Tuesday 8 September 2020

माहीत आहे का ?

🏵️१)जमिनीखालचं गाव🏵️ 🌺सौजन्य - लोकमत पेपर कात्रण🌺 जगाच्या पाठीवर आश्चर्याची कमतरता नाही. वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारच्या गोष्टी चमत्कारिक रूपे घेऊन आपल्यासमोर येतात. आता आपलं पहा. आपल्या वसाहती आहेत जमिनीवर! म्हणजे आपण आपली घरे जमिनीवर बांधतो,पण जमिनीखाली ही वसाहत असते आणि तेथेही माणसे राहतात अस आपण पाहिलं किंवा ऐकलं तर ?पण हे खरे आहे असेही एक गाव आहे बर का! ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या अंडलेड या शहरापासून ८५० किलोमीटर अंतरावर असलेल्या कुबरपेडी गावातील ७० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक लोक जमिनीखाली राहतात. ही त्यांची जमिनीखालील घरे'खणलेली निवास' म्हणून ओळखले जातात. या भागातील जमीन ही मुरमाची असून इथे झाडेझुडपांची नामोनिशाणीही नाही.इथे वाळूच्या टेकड्या खोदून त्यात त्यांनीही घरे बनवली आहेत. या जमिनीखालच्या घरामधील तापमान वर्षभर २४अंश सेल्सिअस एवढं राहावं म्हणून एअर व्हेंटिलेशन राँफ्ट्स वापरतात. त्यामुळे हवा खेळती राहते व तापमानही स्थिर राहते. या घरांमध्ये मंद प्रकाश, मातीचा कुबट वास क्षीण असा आवाज अशा किरकोळ अडचणी जाणवतात. पण या अडचणींना बाजूला ठेवलं तर भुपुष्ठावर असणारी आपली घरे व जमिनीखालचे घरे या दोघांमधील जीवनात फारसा काही फरक दिसत नाही ,हो,आणखी एक मोठा उपद्रव म्हणजे धुळीचा येथे असलेल्या रेताड जमिनीमुळे आतील बाजूसही त्रास जाणवतो बर का!तर आता केव्हा जायचं आपण या गावाला भेट द्यायला?

Saturday 11 April 2020

सुस्वागतम् ...

 

सुस्वागतम् ... सुस्वागतम्


पाखरांची शाळा'  या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत ....

💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्रीमती सुनिता पवार
जि. प. प्राथमिक शाळा खडगाव 
ता. चोपडा. जि. जळगाव

Tuesday 21 August 2018

पुस्तके
आपल्याला हवी ती पुस्तके
ऐका क्लिक वर डाउनलोड
करू शकतात चला तर
मग डाउनलोड करा पुस्तक
व वाचन वाढवा
वाचाल तर वाचाल
ही म्हण खरी करून दाखवा

Download